चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बालेवाडी-बाणेर रस्त्यावर भरधाव डंपरने एका तरुणाला चिरडले, त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३५ वर्षाचा एक तरुण बालेवाडी फाटा कडून बालेवाडी कडे जात असताना १२ सप्टेंबरला दुपारी सव्वा बारा वाजता हा अपघात झाला. पोलीस अंमलदार साची बिर्गल यांनी फिर्याद दिली आहे. चालक अपघातानंतर पळून गेला. सहायक पोलीस निरीक्षक दादराजे पवार तपास करीत आहेत.
















