चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लिफ्ट मागणाऱ्या प्रवाशाला कारचालकाने लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रवाशाकडून १,८५,००० रुपये लुटले गेले आहेत.
चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २३ वर्षीय तरुण आहे. त्याला आणि त्याच्या मित्राला ११ सप्टेंबर रोजी खराडीहून पुणे रेल्वे स्टेशनवर जायचे होते.
त्यांनी लिफ्ट मागून कारमधून प्रवास सुरू केला. मात्र, चालक व कारमधील त्याच्या साथीदारांनी त्यांना हत्यारांचा धाक दाखवून चाकण परिसरात नेले. मित्राच्या गळ्यातील चांदीचे पाच हजारांचे दागिने काढून घेतले. फिर्यादीच्या बँक खात्यावर असलेले १,८०,००० रुपये विविध अनोळखी ठिकाणी नेऊन एटीएमद्वारे काढून जबरदस्तीने चोरी केली. पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे या प्रकरणाचा तपास करत आहेत.















