लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कारच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पिंपरी सांडस येथे घडली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता हा अपघात घडला. जमादार वस्ती, पिंपरी सांडस रोडवर हा अपघात झाला. त्यात गणेश मारुती वायकर (वय ५३ वर्षे, रा. ता. हवेली, जि. पुणे) गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघात घडल्यावर चालक थांबला नाही आणि खबर न देता पळून गेला.
सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.















