महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरातील कैवल्य संजय डागा याने आयआयटीमधील सर्वोच्च आणि प्रतिष्ठित डॉ. शंकर दयाल शर्मा सुवर्ण पुरस्कारासह डिपार्टमेंटमधील सिल्वर मेडल पटकाविले आहे. आयआयटी मुंबई येथे हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.
आयआयटी येथे शिक्षण घेत असलेल्या अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट व पीएचडी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांमधून मेरिटनुसार एका विद्यार्थ्यांची निवड केली जाते. तसेच यासाठी विद्यार्थ्याची अष्टपैलू कामगिरी विचारात घेण्यात येते.
या सुवर्णपदकासह कैवल्यने मेकॅनिकल डिपार्टमेंटमधील अव्वल स्थान प्राप्त करत सर्वोत्तम कामगिरीसाठी असलेले रौप्यपदकही मिळवले आहे. कैवल्य याने ही कामगिरी २२ व्या वर्षी साध्य केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
तसेच त्याला कमी वयात आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करण्याचा देखील अनुभव आहे. तसेच अमेरिकेतील प्रतिष्ठित कारगिल कंपनीत ‘ग्लोबल लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम’ आयोजित करतात. जगातील फक्त सहा देशातील १० सर्वोत्तम विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यात देखील कैवल्यची निवड झाली होती.
या व्यतिरिक्त कैवल्यने विविध क्षेत्रांत बहुमूल्य कामगिरी केली आहे. आयटी बॉम्बेमध्ये खेळांच्या स्पर्धांमध्ये, कैवल्यने वॉटरपोलोमध्ये दोनदा गोल्ड मेडल तसेच स्विमिंग स्पर्धेमध्येही गोल्ड मेडल जिंकले आहे.
तसेच सिंगापूर युनिव्हर्सिटीमध्ये कैवल्यला रिसर्च टीमसोबत काम करण्याची संधी मिळाली. याव्यतिरिक्त स्मार्ट ग्रीन आयलँड मेकअथॉन हा कार्यक्रम स्पेनमध्ये राबविण्यात आला होता. यामध्ये २० पेक्षा जास्त देशांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. आशिया खंडातून फक्त आयआयटी बॉम्बेची निवड करण्यात आली होती.
