महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सिद्धी तप समाप्ती निमित्त बिबवेवाडी जैन स्थानक येथे ४७ तप साधकांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र प्रवर्तिनी श्रमणी सूर्या, प. पू. डॉ. श्री ज्ञानप्रभाजी म. सा. यांच्या सुशिष्या तपस्वी रत्न – प. पू. श्री पुष्पचुलाजी म. सा. आणि अनुशासनप्रिय प. पू. श्री सुप्रियदर्शनाजी म. सा. आदी ठाणा ५ यांचा चातुर्मास हर्षोल्हासात सुरू आहे.
बिबवेवाडी जैन स्थानकात रविवारी (१५सप्टेंबर) ४७ सिद्धी तप साधकांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी सर्व आराधकांची धर्मरथात मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मंगला चरणाने झाली आणि सत्य साधना मंडळ तसेच बहुश्रुत मंडळाच्या सदस्यांनी स्वागतगीते गाऊन सर्वांचे स्वागत केले. या प्रसंगी लहान मुलींनी आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला, ज्याने सर्व उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी बिबवेवाडी संघाचे उपाध्यक्ष माणिक दुगड यांनी सूत्रसंचालन केले तर महामंत्री गणेश ओसवाल यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिबवेवाडी श्री संघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माणिक दुगड, रमेशलाल गुगळे, पन्नालाल पितळीया, गणेश ओसवाल, अविनाश कोठारी, लालचंद कर्नावट, सुनील बलाई, प्रवीण चोरबेले, सुभाष बाफना, संपत भटेवरा, संजय श्रीश्रीमाळ, अशोक नहार, रवींद्र दुगड, सुनील दुगड, विजय समदडिया, चंपालाल नहार, कीर्तिराज दुगड, प्रकाश गांधी, चंद्रकांत सुराणा, बाळासाहेब कोयाळीकर, रामलाल संचेती, चंद्रकांत लुंकड यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
