सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : किरकोळ वादातून युवकाला लोखंडी सळईने मारहाण केल्याचा प्रकार धनकवडी परिसरात घडला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सनी पवार (वय २०, रा. धनकवडी) यांच्या आईला ३० सप्टेंबर रोजी रात्री ११:३० च्या सुमारास शनिमंदिराजवळ चव्हाणनगर येथे एका महिलेने शिवीगाळ केली होती.
याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी तेथे गेले असता, पाच महिला व चार पुरुषांनी त्यांना लोखंडी सळईने मारहाण केली. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील करीत आहेत.















