खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी पायी जाणाऱ्या युवकाचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना भरदिवसा स्वारगेटच्या जेधे चौकात घडली आहे.
या प्रकरणी एका तरुणाने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण १ ऑक्टोबर रोजी सव्वा वाजता पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला.
हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कदम करीत आहेत.
