महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि कोहिनूर ग्रुपचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजेश गोयल यांना पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘डिजिटल इंफ्लूएंसर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईतील विक्रोळी येथील ताज द ट्रीस हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात समारंभपूर्वक हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार तसेच शिवसेनेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. या समारंभात रिअल इस्टेट व विविध क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींना त्यांच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.

