महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने लायन्स क्लब बार्शी रॉयल यांच्याकडून वाचनालयास पुस्तके भेट देण्यात आली.
श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात लायन्स क्लब बार्शी रॉयलच्या अध्यक्षा वर्षा गुंदेचा (खांडवीकर) यांच्या शुभ हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी सेक्रेटरी अमृता अमोल गुंडेवार, हेमल माढेकर, आर्चना पाटील, माजी प्रांत जितेंद्र दोशी, संजय गुंदेचा, अमर काळे MJF, वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, संचालक धिरज कुंकूलोळ हे उपस्थित होते.
लायन्स क्लब बार्शी रॉयल यांच्या कडून वाचनालयास पुस्तके भेट देण्यात आली. वाचनालयाचे संचालक धिरज कुंकूलोळ यांनी सुत्रसंचालन केले. वाचनालया तर्फे प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला.
ग्रंथपाल सुरेश यादव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव, सहायक ग्रंथपाल पल्लवी तौर, विराज पतंगे यांनी परिश्रम घेतले.


















