२८ वे वर्ष : दुगड ग्रुपच्या वतीने आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आगम टेकडीवर असलेल्या सच्चियायी माता,आशापुरा माता,सुसवानी माता यांचा नवरात्र महोस्तव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उस्तहात पार पडणार आहे.यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन दुगड ग्रुपचे प्रमुख प्रमोद दुगड यांनी केले आहे.
स्व. माणिकचंदजी दुगड यांनी या मंदिराची स्थापना मागील २७ वर्षापुर्वी या भागात केली होती. त्यानंतर या भागाचा कायापालट झाला. यंदा या नवरात्र महोस्तवाचे हे २८ वे वर्ष आहे.या ९ दिवसात या ठिकाणी दररोज आरती, होम, अभिषेक, दांडिया, होम मिनिस्टर, गौतमी पाटील ऑर्केस्ट्रा, सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन मंदीर समितीच्या वतीने केले जाते.
येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी या ठिकाणी ९ दिवस प्रसादी ठेवली जाते. या ९ दिवसात अनेक राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी माताजीच्या दर्शनासाठी येत असतात.या ठिकाणी सौ. कमलादेवी कर्णावट (माताजी) देखील उपस्थित असतात. त्यांच्याही दर्शनाचा लाभ सर्व भक्तांना मिळत असतो.
या ९ दिवसात होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविकांनी घेण्याचे आवाहन दुगड ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे. उद्या दिनांक 3 आक्टोबर २०२४ रोजी दुपारी 4 वाजता आगम मंदीर पासून भव्य वरघोडा निघणार आहे.

