महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : गिरीश खुशालचंद सोळंकी यांनाराज्यस्तरीय रक्तदाता सामाजिक सेवा समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार अॅक्युप्रेशर, न्यूट्रिशन, अस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी अॅकॅडमी, मलेशियातर्फे देण्यात आला. संस्थेचे डॉ. अजित बागमार, लायन्स क्लबचे विजय मानकर, डॉ. संतोष वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्कार मिळाल्याने आपली समाजसेवा करण्याची जबाबदारी वाढते आणि त्यामुळे अधिक काम करण्यास प्रेरणा मिळते, असे गिरीश सोळंकी यांनी सांगितले.

