सुनिल जिंतुरकर अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर :शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीमध्ये नागरिकांनी भगर व इतर उपवासाचे पदार्थ खरेदी करताना काळजी घ्यावी,त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यताआहे, असा सावधानतेचा इशारा सोलापूरच्या अन्न आणि अवशद प्रशासनाने दिला. आहे. काही शंका आल्यास अधिकाऱ्यांशी सम्पर्क साधावा असे आवाहन विभागाने केले आहे. नागरिकांनी उपवासाचे पदार्थ खरेदी करताना सजग राहून अशी काळजी घ्यावी.
१) भगर व इतर उपवासाचे पदार्थ खरेदी करताना परवानाधारक / नोंदणीधारक अस्थापना कडूनच खरेदी करावेत.
२) पॅकबंद असलेलेच भगर / उपवासाचे पदार्थ विकत घ्यावेत.
३) सदर पॅकेटवर उत्पादकाचा तपशील, बॅच नंबर इत्यादी तपासून खरेदी करावेत.
४) पॅकेटवर भगरीचे उत्पादन केंव्हा झाले याचे तपशील असतो तो तपासून पाहावा.
५) त्यावरील “बेस्ट बिफोर” वा “EXPIRE DATE” म्हणजे भगरीची अंतिम वापराची मुदत केंव्हा संपत आहे हे तपासूनच खात्री करून खरेदी करावी.
६) भगरीचे सुट्टे पीठ खुल्या बाजारातून / हातगाडीवरून विकत घेऊ नये.
७) बाजारातून पॅकबंद भगर खरेदी केल्यावर ती स्वच्छ करून त्यानंतरच घरगुती पद्धतीने पीठ तयार करावे.
८) खरेदी केलेल्या भगर या अन्नपदार्थाचे विक्रेत्याकडून पक्के खरेदी बिल घ्यावे.
९) सकाळी बनवलेली भगर संध्याकाळी / रात्री शिळी झाल्यानंतर तिचे सेवन करण्यात येऊ नये.
१०) भगर व इतर उपवासाचे अन्न पदार्थ स्वच्छ वातावरणात व स्वच्छ जागेमध्ये तयार करावेत.
११) भगर व इतर उपवासाचे अन्नपदार्थ बनविण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करण्यात यावा.
१२) भगर व इतर उपवासाचे अन्नपदार्थ पूर्णपणे, योग्यप्रकारे शिजूनच सेवन करावे.
१३) फलाहार घेताना फळे ताजी, योग्य प्रकारे साठवणूक केलेली, योग्य रित्या पिकवलेली अशीच फळे खरेदी करावीत.
१४) दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थ हे ताजे व योग्या तापमानात साठवणूक केलेले आहेत याची खात्री करूनच खरेदी करावी (दुध, बासुंदी, रबडी, श्रीखंड, दही इत्यादी)
१५) दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थ हे ताजे व योग्या तापमानात साठवणूक केलेले योग्या कालावधी मध्येच सेवन करावे.
१६) अन्न विषबाधा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.