महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शीच्या राजवर्धन तिवारीला राज्य मानांकन आमदार चषक टेबल टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळाले आहे.
महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन यांच्या मान्यतेने जळगाव टेबल टेनिस असोसिएशन आयोजित आमदार चषक 4 थी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा एम. जे. कॉलेज जळगाव येथे 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत विविध गटामध्ये तब्बल 700 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या हस्ते राजवर्धन तिवारी याला बक्षिस वितरण करण्यात आले.
राजवर्धन तिवारी हा बार्शी टेबल टेनिस अकॅडमी येथे प्रशिक्षण घेत आहे.तो सेंट जोसेफ येथे इयत्ता 2री मधे शिकत आहे.तो गेली 2 वर्षे बार्शी टेबल टेनिस अकॅडमी येथे प्रशिक्षण घेत आहे.
त्याला प्रशिक्षक म्हणून गणेश स्वामी मार्गर्शन करत आहेत. राजवर्धन तिवारी याला राज्य मानांकन स्पर्धेत या आधी 9 वे स्थान होते आता त्याच्या या विजयाने त्याच्या रँकिंग मध्ये देखील त्याला अव्वल स्थान मिळेल.
त्याच्या या विजयामाआघे अजय बोरवणकर जनरल मॅनेजर बार्शी टेक्सटाइल मिल (हे क्रिडा प्रेमी व स्वतः राज्यस्तरीय खेळाडू आहेत) यांचा देखील मार्गदर्शक म्हणून मोठा हातभार आहे. राजवर्धन तिवारी याचे वडिल बार्शी टेक्सटाइल मिल येथे सिक्युरिटी इन्चार्ज आहेत.
मागील स्पर्धेत आलेल्या अपयाशाला न घाबरता सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे असं बोरवणकर सांगत राहिले त्यामुळेच तो टेबल टेनिस सतत खेळू शकला. त्याने प्री क्वाटरमध्ये मन परमार ( ठाणे) याचा 3-2 असा पराभव केला , क्वाटरफायनल मध्ये कार्तिक ठाकरे (ठाणे) याचा 3-1 असा पराभव केला.
Semifinal मध्ये अवियान सिंह वालिया (मुंबई) याचा 3-0 असा पराभव केला व अंतिम सामन्यात नभ पांचोलिया(पुणे) याचा 3-1 असा पराभव करत विजेतपद मिळविले.