कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न कोंढवा परिसरात झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भैरवनाथ मंदिराशेजारी कोंढवा बु. येथील एका तरुणावर ७ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता तीन जणांनी हल्ला केला.
चांदतारा चौक ते साई सर्व्हिस, कोंढवा परिसरात तिघांनी फिर्यादीचा पाठलाग करून जुन्या भांडणाचा राग मनात धरून, फिर्यादीच्या डोक्यात व पाठीत लोखंडी हत्याराने वार केले व त्याला गंभीर जखमी केले.
त्याचा जीव घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुकेशनी जाधव करीत आहेत.

