प्रविण गांधी व धनेश गांधी पुरस्काराचे मानकरी
महाराष्ट्र जैन वार्ता
आळंदी : न्यू चैतन्य ग्रुप चिखली यांच्या वतीने “समाजभूषण- आदर्श पिता-पुत्र जोडी” या पुरस्काराने प्रविण गांधी व धनेश गांधी यांचा सन्मान करण्यात आला. प. पू. प्रशांतऋषीजी म. सा. यांच्या सानिध्यात प्रसिद्ध उद्योगपती कांतीलाल मुनोत यांच्या हस्ते व सुवालाल बोरा, गोकुळ मुनोत, प्रा. अशोककुमार पगारिया, सुनील बाफना यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या पुरस्काराचे आयोजन ग्रुपच्या संस्थापिका अध्यक्षा अनिता नहार आणि ग्रुपमधील सद्स्यांनी केले होते.

