वंचित आघाडीकडून प्रवीण रणबागुल यांना उमेदवारी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : परंडा-भूम-वाशी विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे परंडा विधानसभा मतदारसंघातील पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी पक्षाचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (दि. १६) जाहीर केली आहे. या यादीत राज्यातील ३० उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये परंडा २४३ विधानसभा मतदारसंघात वंचितचे अधिकृत उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
परंडा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवार म्हणून प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, तर महाविकास आघाडीकडून माजी आ. राहुल मोटे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. वंचित आघाडीकडून श्री. रणबागुल यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
