World Food India २०२४ मध्ये नोंदवला महत्त्वपुर्ण सहभाग
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दि इको फॅक्टरी फांउडेशनचे प्रमुख आनंद चोरडीया यांचे खाद्य मंत्रालयाकडुन प्रशस्ती पत्र पाठवून कौतुक करण्यात आले.
नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे १७ ते २२ सप्टेंबर २०२४ रोजी World Food India २०२४ प्रदर्शन पार पडले. या ठिकाणी आनंद चोरडीया यांच्या संकल्पनेतून बनवलेल्या Sustanability Desk चे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
या डेक्सला अनेक केंद्रीय मंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकारी यांनी भेटी दिल्या. अतिशय सुंदर पद्धतीने आनंद चोरडीया यांनी या Sustanability Desk चे महत्व सर्वांना समजावून सांगीतले. पुण्यातील या उद्योजकाच्या कल्पकतेचे दिल्ली करांकडून होणारे कौतुक म्हणजे पुणेकरांची मान उंचावणारा हा क्षण आहे.

