विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रेकॉर्डवरील आरोपीकडुन जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन गुन्हयातील चोरीच्या मालासह ०२ पिस्टल व ०४ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात विश्रामबाग पोलीसाना यश आले आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार शास्त्रीरोड येथुन फिर्यादी वृध्द महिला ह्या रस्त्याने जात असताना मोटार सायकल चालकाने गळयातील सुमारे २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावुन नेली होती.
दाखल गुन्ह्याच्या तपासात विश्रामबाग तपास पथकातील पोलीस अंमलदार सचिन कदम यांनी गोपनीय खब-याच्या मदतीने हा गुन्हा रेकॉर्डवरील रफिक सलीम खान, (वय ३६ वर्षे रा.बि.०७, जिवलग हॉसींग सोसायटी, आयटीए स्किम निगडी, पुणे) याने केल्याचे निष्पन्न केले.
आरोपीच्या घरातून सुमारे २० ग्रॅम वजनाच्या चैन सह. ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत काडतुसे मिळुन आली. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन आरोपी विरुध्द खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), अरुण घोडके, तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार सचिन कदम, मयुर भोसले, अशोक माने, गणेश काठे, सचिन अहिवळे, शैलेश सुर्वे, जाकीर मणियार, कैलास डुकरे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, नितीन बाबर, संतोष शेरखाने व सागर मोरे यांनी केली.