महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथे बुधवारी १४ वर्षाखालील मुलांनी सलग १० तास स्विमिंग करण्याचा विक्रम नोंदवला आहे.
हा विक्रम आदर्श चौरे २४ किमी, उदय जाधव २२ किमी रणवीर सातपुते २३ किमी, माधव शिंदे २२.५ किमी, शौर्य नवले १९ किमी, केशव शिंदे १९ किमी, तन्वी नवले १७.५ किमी, भार्गवी मुळे २० किमी, हर्षदा चव्हाण २० किमी, धैर्यशील ताकभाते १४ किमी, तेजस्विनी ताकभाते १९ किमी, शुभ्रा कडगंची १२ किमी, स्वराज डोईफोडे १२ किमी, आयुष जाधव ६ किमी यांनी केला.
पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांनी त्यांनी पोहण्यास सुरुवात केली ते सलग दहा तास २ वाजून ३६ मिनिटापर्यंत सलग स्विमिंग करून कर्मवीर जलतरण तलाव बार्शी येथे नवीन विक्रम प्रस्थापितकेला आहे..
हा विक्रम रचल्यामुळे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय यादव, जनरल सेक्रेटरी पी.टी.पाटील खजिनदार जयकुमार शितोळे व कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉ.एस.एस.गोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
यापूर्वी ६ तास स्विमिंगचा विक्रम केला होता. तोच विक्रम त्याच विद्यार्थ्यांनी आज मोडीत काढला त्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे गुजरात येथे झालेल्या सागरी जलतरण मध्ये दहा किमी व चेन्नई येथे झालेल्या १० किमी आणि १६ किमी येथे देखील या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले होते.
तसेच येत्या 24 नोव्हेंबर रोजी विजयदुर्ग येथे ३० किलोमीटरच्या राष्ट्रीय स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.स्पर्धा यशस्वीतेसाठी कर्मवीर जलतरण तलावाचे व्यवस्थापक सुंदर लोमटे व कोच बाळराजे पिंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.