डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : एफ.सी. कॉलेजच्या कॅम्पसमधील बॅटऱ्या चोरणाऱ्यांना १२ तासात जेरबंद करण्यात डेक्कन पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ ऑक्टोबर ते दि. ४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आयएमडीआर कॉलेज, आगरकर रोड, पुणे येथील युपीएस रूममधील जिन्याखालील रॅकमधून ४३ युपीएस बॅटऱ्या चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले आणि अजय भोसले यांनी तपास पथकासह तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने १२ तासांच्या आतच १) सचिन शहाजी डोकडे (वय २१ वर्षे, रा. बजरंग बली मित्र मंडळाजवळ, आकाशगंगा सोसायटी समोर, वडारवाडी, पुणे) आणि २) राहुल यंकाप्पा पाथरुट (वय २० वर्षे, रा. जयमित्र मंडळाजवळ, जुनी वडारवाडी, पुणे) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्या चौकशीत या गुन्ह्याची कबुली मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आली आणि चोरीस गेलेल्या बॅटऱ्या आरोपींकडून हस्तगत करण्यात आल्या. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. जी. शिंदे करीत आहेत.
सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, दत्तात्रय सावंत, सहाय्यक फौजदार शिंदे, राजेंद्र मारणे, पोलीस अंमलदार नरेंद्र पवार, सागर घाडगे, वसिम सिद्दीकी, धनाजी माळी, रोहित पाथरुट यांच्या पथकाने केली.
