सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना दि. १२ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३० च्या सुमारास घडली आहे. फिर्यादी रात्रीच्या वेळी पवन बिंल्डीग, डी. एस. के. विश्व सोसायटी येथील रिक्षा स्टँडमध्ये मोबाईलवर बोलत बसले होते.
त्यावेळी दोन अनोळखी इसम हे फिर्यादी यांचे जवळ येवुन, येथून बस जाते का? अशी विचारणा करून फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांचे गळ्यातील १,००,०००/- रुपये किमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने चोरून नेली. हा तपास पोलीस उप निरीक्षक शिवाजी बुनगे करीत आहेत.

















