काळेपडळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
किरकोळ कारणावरून दहशत निर्माण करीत सय्यदनगरमध्ये दोघांवर लोखंडी हत्याराने वार करण्यात आले आहेत.त्यांच्या पाठीवर व डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ११ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३० च्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी मोहम्मद हुसेन शबीर शेख उर्फ अज्जु (रा. ससाणेनगर) याला अटक करण्यात आली आहे. गल्ली नं १५ सय्यदनगर हडपसर येथे फिर्यादी व त्यांचा मित्र असे दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात असताना आरोपीने त्यांच्याशी वाद घालीत हातामध्ये लोंखडी हत्यार घेवुन मोठ मोठ्याने आरडा ओरड करुन दहशत निर्माण केली व फिर्यादी यांच्या पाठीवर व डोक्यास वार करुन दुखापत केली. हा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लटपटे करीत आहेत.
