बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गेम पॅलाशिव रेस्टारंन्टच्या तिजोरीमधुन ११ लाखाची रोकड चोरीस गेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१२ नोव्हेंबर रोजी ०९:१५ च्या सुमारास ही घटना घडली आहे. राजा बहादूर मिल नजीक असलेल्या गेम पॅलाशिव रेस्टारंन्टमधील कॅशियरसह दोघांनी तिजोरीत असलेली ११,२४,५६०/- रुपये रोख रक्कम चोरुन नेली आहे. रेस्टारंन्टच्या मालकाने पोलिसात तक्रार दिली आहे. हा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत खेडकर करीत आहेत.
