महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आदिनाथ स्थानक येथे प्रवर्तक प. पू. प्रकाशमुनिजी म. सा., मधुरवक्ता प. पू. गौतममुनिजी म. सा., सेवाभावी प. पू. चेतनमुनिजी म. सा., प. पू. दर्शनमुनिजी म. सा., प.पू. अभिनंदनमुनिजी म. सा., मधुर व्याख्याता प. पू. चंदनबालाजी म. सा., आदि ठाणा २, श्रमणसंघीय उपप्रवर्तनी प. पू. सुमनप्रभाजी म. सा. प.पू स्वर्णश्रीजी आदि ठाणा ७, प. पू. सौरभसुधाजी म. सा. आदि ठाणा २ आदी संतांच्या पवित्र सानिध्यात व धार्मिक उपक्रमाने पूज्य प्रवर्तक गुरुदेव श्री प्रकाशमुनिजी म. सा. यांचा ६४ वा जन्म महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी देशातील विविध राज्यातून जैन संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात गुरू-गुणानुवाद सभेने करण्यात आली तसेच गुरू श्री सौभाग्य गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
या पुरस्काराचे यंदाचे मानकरी संजय लुणावत(संस्थापक, भाव मिशन, उदयपुर), राजकुमार खिंवसरा ( आदर्श समाजपती संभाजीनगर), पुणे येथील प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. धीरज सुराणा यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
पुरस्काराचे स्वरूप शाल, मोत्याची माळ,मानपत्र, सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी व एक लाख रुपये रोख असे होते. गौतमलब्धी फाऊंडेशनसाठी आदिनाथ संघ परिवाराच्या वतीने गौतमनिधी संकलन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या गौतमप्रसादीचा लाभ श्रीमती इंदुबाई झुंबरलाल ललवाणी या परिवारास मिळाला.
या कार्यक्रमाला सकल जैन समाजाचे अध्यक्ष विजयकांत कोठारी,पारस मोदी,पोपटलाल ओस्तवाल, अशोक पगारीया,अभय छाजेड, प्रवीण चोरबोले,अनिल भंन्साळी आणि अनेक संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघाचे अध्यक्ष धनराज सुराणा, कार्याध्यक्ष अनिल नहार, सचिव संजय सांकला, दिलीप बोरा, सचिन टाटीया, विजय नवलाखा, रमेश नवलाखा, राजेन्द्र मुथ्था, सुभाष मुथ्था, शैलेश नवलाखा, गौतम नाबरीया, वैभव शिगवी, राहुल ललवाणी यांनी विशेष परीश्रम केले.
