क्रेडिट कार्ड देण्याच्या नावाखाली अपहार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बँकेतून बोलत असल्याचे भासवून क्रेडिट कार्ड देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची ३३ लाख रुपयांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत शिवदर्शन येथे राहणाऱ्या ६१ वर्षाच्या महिलेने पर्वती पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. हा प्रकार ७ ते ९ डिसेंबर दरम्यान घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका नंबरवरुन फोन आला. त्याने बँक ऑफ इंडिया टिममधून बोलत असल्याचे भासविले.
तुम्हाला क्रेडिट कार्ड द्यायचे आहे, असे सांगून व्हॉटसअॅपवर बँकेचा क्रेडिट कार्ड व्हेरिफिकेशन फॉर्म पाठविला. तो फॉर्म भरुन पाठविल्यानंतर त्यांच्या बँकेचा व मोबाईलचा अॅक्सेस सायबर चोरट्याने स्वत:कडे घेऊन त्यांच्या बँक खात्यातून ३३ लाख रुपये काढून घेऊन फसवणूक केली.















