रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत भोजन सेवा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड येथील वाय.सी.एम. रुग्णालयाच्या गेटवर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दर सोमवारी ‘आनंदाकि रोटी’ या नावाने मोफत भोजन उपक्रम राबवला जात आहे.
हा उपक्रम मागील दोन वर्षांपासून सुरू असून, तो संयमलताजी म. सा. आणि सुमन प्रभाजी म. सा. यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे चालवला जात आहे. या उपक्रमामध्ये विक्रम छाजेड, राजेंद्र कटारिया, जवाहर मुथा, विजय गांधी, राजेंद्र छाजेड, नेनसुख मांडोत, मोतीलाल चोरडिया, राजेंद्र जैन, विजय नाहर, अशोक बाफना, पंकज बरडिया, विजय जाधव, सुरेश तरडे यांचा सहभाग आहे.
या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत आणि सात्विक अन्न उपलब्ध करून देणे, जेणेकरून त्यांचा आर्थिक भार कमी होईल आणि त्यांना मानसिक आधार मिळेल.

















