महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : श्री श्वेतांबर जैन मुक्ति पूजक संघाच्या वतीने विश्वजीत देशपांडे यांची “अमृत संस्था” या शासकीय सल्लागार समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. हा सोहळा आराधना भवन, माणिक बाग, निरंजन पार्क येथे पार पडला.
या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात चर्चासत्राचे आयोजनही करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जैन मंदिराचे अध्यक्ष भरत भुरट, सुहास शहा, दिनेश मुथा, नंदू ओसवाल, नवीन दोशी, आण्णा खेनट, राजेश कोल्हे, आशिष दोशी, अभय डुड्डू, प्रशांत डुड्डू, अभिनंदन गांधी, आशिष जैन, जयंती मुथा, शेवंती लुंकड, रमेश गोळीवाडा, विक्रम छाजेड, सुरेश दोशी मुथा, आशिष कांकरिया, प्रवीण धोका, राहुल कांकरिया, संतोष धोका, राकेश लुंकड, जितेंद्र, अशोक लुंकड, हरेश भन्साळी, हिरालाल धोका, प्रवीण बेदमुथा, लक्ष्मीचंद धोका, देवेंद्र पालरेचा, महेंद्र पालरेचा, मुकेश कांकरिया, सुरेश धोका आणि महावीर वाणीगोता आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी विश्वजीत देशपांडे यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.















