महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन हरवलेल्या व गहाळ मोबाईल फोनच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी करण्यात आले होते. या प्रसंगी, बार्शी पोलीस दलाने शोधून काढलेल्या २४ मोबाईल फोन तक्रारदारांच्या हाती सुपूर्द करण्यात आले.
प्रोबेशनरी IPS अधिकारी अंजना कृष्णन आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या हस्ते मोबाईल परत देण्यात आले. बार्शी शहर व परिसरातून गहाळ मोबाईल फोनच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करत पोलीस दलाने विशेष तांत्रिक कौशल्याचा वापर केला. यामध्ये राज्याबाहेर आणि इतर जिल्ह्यांमध्ये गेलेल्या मोबाईलचा यशस्वी शोध घेतला गेला.
वर्ष २०२४ मध्ये सायबर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने बार्शी पोलीस ठाण्याने एकूण १६४ हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला. यापैकी ५८ मोबाईल, ज्यांची किंमत सुमारे ११ लाख ६० हजार रुपये आहे, तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, पोसई उमाकांत कुंजीर यांच्या नेतृत्वाखाली पो.कॉ. धनराज फत्तेपुरे, पो.कॉ. सचिन देशमुख आणि सायबर शाखेचे पो.कॉ. रतन जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.
तक्रार निवारण दिनाच्या निमित्ताने मोबाईल फोन परत मिळाल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले, तर बार्शी पोलीस दलाच्या कार्यकुशलतेचे कौतुक करण्यात आले.















