भुम येथे साठे चौकात मोठ्या संख्येने सभासदांची नोंदणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भुम : दिनांक 9 जानेवारी रोजी, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या वतीने साठे चौक, भुम येथे सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानासाठी विशेष स्टॉल लावण्यात आला होता. भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस जोतिबा नन्नवरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले.
नन्नवरे यांनी आपल्या भाषणात वंचित व समाजातील सर्व घटकांना भारतीय जनता पक्षाशी जोडण्याचे आवाहन केले. “जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा भाग होण्याची संधी प्रत्येक नागरिकाला आहे,” असे नमूद करत त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्या अलका गौर, सचिन बारगजे, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहन जाधव, माजी जिल्हा सरचिटणीस आदम शेख, जिल्हा सचिव अंगद मुरूमकर, जनसेवा बँकेचे व्हॉइस चेअरमन जालिंदर मोहिते, तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, पंचायत राज तालुका अध्यक्ष विभीषण टाळके, उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष संदीप खराडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश भोगील यांसह
अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सभासद नोंदणी अभियानाला तालुक्यातील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जवळपास 540 नागरिकांची नोंदणी करण्यात आली.















