महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : लोकमंगल कॉलेज, वडाळा येथे दिनांक ७ व ८ जानेवारी २०२५ रोजी ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात जिल्ह्यातून एकूण ४८ प्रयोगांचे सादरीकरण झाले. महाराष्ट्र विद्यालय, बार्शीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.
दिव्यांग गटातून चि. आरुष राहुल शहाणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर माध्यमिक गटातून चि. तनवीर जमील तांबोळी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. या दोन्ही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
या उल्लेखनीय यशामध्ये विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले असून, मार्गदर्शनासाठी विद्यार्थिनिष्ठ शिक्षक संग्राम दादासाहेब देशमुख यांचा लोकमंगल समूहाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या विजयाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, सचिव व शाळा समिती
अध्यक्ष पी. टी. पाटील, सहसचिव व शाळा समिती सदस्य ए. पी. देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. मिराताई यादव, एस. बी. शेळवणे, तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य आणि संस्था सदस्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
विद्यालयाच्या प्राचार्या के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षक एस. सी. महामुनी, पर्यवेक्षिका एन. बी. साठे, विज्ञान प्रमुख एस. एम. हाजगुडे आणि सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
