महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीय महिला क्रिकेटपटू दिशा कासट आणि पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत मार्केट यार्ड फ्रेंड्स क्रिकेट लीग (MFCL) सीजन 4 चे दिमाखदार उद्घाटन झाले.
यावेळी मंचावर पुणे मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, दुगड ग्रुपचे रुपेश दुगड, गणेश दाळ आणि बेसन मिलचे सतीश शहा, दी पुणे मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, जय जिनेन्द्र प्रतिष्ठानचे अचल जैन, स्पर्धेत सहभागी १६ संघातील २०८ खेळाडू आणि भुसार बाजारपेठेतील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनाच्या कार्यक्रमात रंजन कुमार शर्मा यांनी पुरुषांबरोबरच महिलांचेही सामने आयोजित करण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच, क्रिकेटच्या माध्यमातून सर्व व्यापाऱ्यांना एका व्यासपीठावर एकत्र आणल्याबद्दल दिशा कासट यांनी MFCL टीमचे कौतुक केले















