आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मेफेड्रॉन अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

Spread the love

पुणे : मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन व्यक्तींना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून १५ लाख ७७ हजार रुपयांचा ७७ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

हुसेन नुर खान (वय २१, रा. नवाझीस पार्क, संपन हाईटस, कोंढवा) आणि फैजान अयाज शेख (वय २२, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अंमलदार विशाल दळवी यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर कॅम्प परिसरातील महात्मा गांधी रोडवरील कोळसे गल्ली येथे कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्यांच्याकडे १५.७७ लाख रुपयांचा मेफेड्रॉन सापडला. लष्कर पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, आणि पोलीस अंमलदार संदेश काकडे, विशाल दळवी, विनायक साळवे, प्रविण उत्तेकर, दत्ताराम जाधव, विपुल गायकवाड, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी पार पाडली.