विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत पारितोषिके : शिक्षकांना जीवनगौरव पुरस्कार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : पोदार फिनिक्स लर्निंग स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग साकारत शिवचरित्राला नवसंजीवनी दिली. विद्यार्थ्यांच्या अभिनय कौशल्याने शिवकालीन इतिहास जिवंत झाला.
कार्यक्रमात जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सोलापूरचे उपआयुक्त विजय कबाडे, संस्थेच्या अध्यक्षा अॅड. वैशाली कबाडे, सचिव संदीप बर्डे, प्रमुख वक्ते विशाल गरड, कॅप्टन विलास सूर्यवंशी आणि मुख्याध्यापक संप्रहास संदगिरी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
वर्षभरात जिल्हा व राज्यस्तरावर मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समृद्धी भड, स्वराज जाधव, सुहानी मगर, वल्लभ पोळ, अभयसिंह पाटील, मुक्ता सुरवसे, वेद जहागीरदार, स्वराली मस्के, शौर्य पवार, आराध्या घुटे, जय बुरगुटे, समृद्धी सातपुते, उदयन गायकवाड, राजेश्वरी मसाळ, शर्वरी भोसले, आणि कुणाल करळे यांचा समावेश होता.
बुद्धिबळ, जलतरण, स्केटिंगसारख्या क्रीडा प्रकारांमध्ये अनन्या उलभगत, अक्षरा देशमाने, यशवर्धन भोसले, पृथ्वीराज जाधव यांनी यश मिळवले. मिस टीन महाराष्ट्रचा किताब सृष्टी मुखणे यांनी पटकावला.
संस्थेतील हनुमंत चव्हाण, प्रतिभा हावळे, माया सावंत आणि विजय ढगे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमात उत्कृष्ट अभिनय, संगीत, वेशभूषा आणि प्रकाशयोजना यांमुळे वातावरण आनंदी झाले. पालकांनी कार्यक्रमाचे कौतुक करून आयोजकांचे अभिनंदन केले.
