आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वर्चस्वासाठी माजवली दहशत

Spread the love

पुणे : बोपदेव घाट परिसरात गुन्हेगारी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कॉलेजबाहेरील रस्त्यावर एका तरुणाला कोयत्याने मारहाण करणाऱ्या टोळीला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. यावेळी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून शस्त्रांसह वाहने असा एकूण ३ लाख ८० हजारांचा माल जप्त केला आहे.

भावेश बाळासाहेब कुंजीर (२३, रा. सासवड), अथर्व कैलास पवार (२१, रा. बी. टी. कवडे रोड, दळवीनगर, घोरपडी), सूरज सचिन राऊत (२१, रा. सासवड-बोपदेव घाट रोड, येवलेवाडी), आर्यन विलास पवार (१८, रा. ओम सोसायटी, दळवीनगर, घोरपडी), सौरभ प्रदीप लोंढे (१८, रा. संदेश सहकारी सोसायटी, संभाजीनगर, धनकवडी, मूळ रा. सातेफळ, ता. कळंब, जि. धाराशिव), राज दिगंबर रोंगे (१९, रा. सिंगापूर होम्स, येवलेवाडी), आणि वरुण बबन भोसले (२१, रा. आनंदनगर, जेजुरी, ता. पुरंदर).

१६ जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास ट्रिनिटी कॉलेजसमोरील रस्त्यावर विश्वजित बाबाजी हुलवळे (१९, रा. येवलेवाडी) याला कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले होते. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता.

आरोपींचा शोध घेत असताना १८ जानेवारी रोजी पोलिस कर्मचारी सतीश चव्हाण आणि विशाल मेमाणे यांना माहिती मिळाली की, आरोपी राज रोंगे सिंगापूर होम्स, येवलेवाडी येथे लपले आहेत. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी सातही आरोपींना अटक केली.

आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली धारदार शस्त्रे आणि वाहने असा एकूण ३ लाख ८० हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर, निरीक्षक (गुन्हे) अब्दुल रौफ शेख आणि सूरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलिस कर्मचारी अमोल हिरवे, सतीश चव्हाण, नीलेश देसाई, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, शाहिद शेख, सूरज शुक्ला, सागर भोसले, सुजित मदन आणि राहुल थोरात यांनी केली.