आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

परांडा मतदारसंघातील 2508 शेतकऱ्यांचे अनुदान थकीत

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

भूम : परांडा विधानसभा क्षेत्रातील भूम, परांडा आणि वाशी तालुक्यातील 2508 शेतकऱ्यांचे विविध योजनांमधील 4 कोटी 74 लाख 59 हजार 394 रुपये अनुदान मागील दोन वर्षांपासून थकीत आहे.

भूम तालुक्यातील 1377 शेतकऱ्यांचे 1 कोटी 83 लाख 51 हजार 822 रुपये, परांडा तालुक्यातील 415 शेतकऱ्यांचे 1 कोटी 63 लाख 56 हजार रुपये, तर वाशी तालुक्यातील 718 शेतकऱ्यांचे 1 कोटी 27 लाख 51 हजार 572 रुपये अनुदान थकबाकीत आहे.

ग्रामीण शेतकरी सतत नैसर्गिक आपत्ती आणि संकटांना सामोरे जात असून त्यांना शासकीय योजनांचे अनुदान वेळेत मिळणे अत्यावश्यक आहे. यासाठी आमदार राहुल मोटे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून लवकरात लवकर कार्यवाहीची मागणी केली आहे.