MSAT परीक्षेत कु. सानवी देशपांडे द्वितीय; शिष्यवृत्ती व ISRO भेट
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : डॉ. होमी भाभा फाउंडेशन, मुंबईद्वारे आयोजित MSAT परीक्षेत सुलाखे हायस्कूलच्या कु. सानवी प्रशांत देशपांडे हिने राज्यात दुसऱ्या क्रमांकाने यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल तिला शिष्यवृत्ती, ISRO भेट तसेच विविध बक्षिसे मिळणार आहेत.
डॉ. होमी भाभा फाउंडेशनतर्फे आयोजित डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा (MSAT) देशभरातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. या परीक्षेत सुलाखे हायस्कूलच्या इयत्ता ८ वी ‘क’ मधील विद्यार्थिनी कु. सानवी प्रशांत देशपांडे हिने द्वितीय क्रमांक पटकावून विद्यालयाचा गौरव केला आहे.
तीन टप्प्यांत होणाऱ्या या परीक्षेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात लेखी परीक्षा होतात, त्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या टप्प्यात मुलाखत घेतली जाते. कु. सानवीने पहिल्या दोन टप्प्यांमध्ये यश संपादन केले असून ती तिसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरली आहे.
सानवीच्या या यशामागे शाळेतील विज्ञान शिक्षक संतोष तोडकरी यांचे मार्गदर्शन आणि तिचे पालक प्रशांत देशपांडे व प्रणिता देशपांडे यांचे पाठबळ आहे. तिच्या यशाबद्दल तिला शिष्यवृत्ती, ISRO भेट, नवनीत व अन्य प्रायोजकांकडून भेटवस्तू, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
कु. सानवीच्या या अभूतपूर्व यशासाठी बार्शी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंद सुलाखे, सचिव अनंत कवठाळे, प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर, उपप्राचार्य रामकृष्ण इंगळे, पर्यवेक्षक प्रसन्न देशपांडे, उर्मिला जावळे, विज्ञान शिक्षक संतोष तोडकरी व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले. तसेच ISRO भेटीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
