विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी : शाळेचा निकाल उज्ज्वल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत सुलाखे शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक हरिदास कुंभार, रामचंद्र इकारे, आणि दीपक माने यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष आनंद सुलाखे, सचिव अनंत कवठाळे, प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर, उपप्राचार्य रामकृष्ण इंगळे, पर्यवेक्षक प्रसन्न देशपांडे आणि पर्यवेक्षिका ऊर्मिला जावळे यांनी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
एलेमेंटरी परीक्षेत 97.93% निकाल
एलेमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी सुलाखे शाळेतून 97 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 95 विद्यार्थी यशस्वी झाले असून शाळेचा निकाल 97.93 टक्के लागला आहे. यामध्ये 12 विद्यार्थ्यांनी ‘अ’ श्रेणी आणि 12 विद्यार्थ्यांनी ‘ब’ श्रेणी प्राप्त केली आहे.
‘अ’ श्रेणी प्राप्त विद्यार्थी : आराध्या देवकते, अदिती जाधव, अनुष्का चिकणे, अन्वी गोसावी, गार्गी नाकटिळक, गौरी नागरगोजे, कणाद जोशी, ओवी बुरांडे, शहाणम शेख, सिद्धी घळके, वैष्णवी निंबाळकर, विनया जाधव.
‘ब’ श्रेणी प्राप्त विद्यार्थी : आराध्या कडवे, आराध्या जाधव, अर्णव ठाकूर, अवंती तिकटे, देवयानी वीर, राजवीर परदेशी, ऋषिकेश काथवटे, सई सुरवसे, श्रेया उंबरदंड, तनिष्का शिंदे, तोहीद शेख, वृषाली साळुंखे.
इंटरमिजिएट परीक्षेत 94.91% निकाल
इंटरमिजिएट परीक्षेसाठी सुलाखे शाळेतून 61 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 59 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाळेचा निकाल 94.91 टक्के लागला आहे. यामध्ये 3 विद्यार्थ्यांनी ‘अ’ श्रेणी आणि 5 विद्यार्थ्यांनी ‘ब’ श्रेणी मिळवली आहे.
‘अ’ श्रेणी प्राप्त विद्यार्थी : प्रणिता वाळके, साधना वट्टमवार, सिद्धी व्हनकळस.
‘ब’ श्रेणी प्राप्त विद्यार्थी : आर्या कांदे, हर्षदा माळी, रिया ननवरे, साक्षी काळे, वेदिका मसलकर.
