युवासेनेचा पुढाकार : ५१ रक्तदात्यांचे योगदान
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवासेना बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून समाजसेवेचा आदर्श ठेवला.
शिबिराची सुरुवात शिवाजी कॉलेज परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या प्रसंगी आमदार दिलीपराव सोपल, पोलीस उपनिरीक्षक धनप्पा शेटे, उद्योजक नाना वाणी, आबा पवार, मंगलताई पाटील आबा गपाट, राजाभाऊ पाटील, सिनेट सदस्य उषा पवार, शिवसेना शहरप्रमुख दिनेश नाळे, युवतीसेना तालुकाप्रमुख रजनी पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमंत रामगुडे, जिल्हा चिटणीस दिपक तिवाडी, महिला आघाडीच्या कोकिळा जंगले, पिंटू नाईकवाडी, नवनाथ चोबे, अंबऋषी लोकरे, सुरेश मोरे, बापू जाधव, आनंद काशीद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार सोपल यांनी या वेळी तरुणांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आदर्श घेत समाजकारण करण्याचे आवाहन केले. शहरप्रमुख हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यातील तरुणांच्या अडचणी सोडवण्यासाठी युवासेना तत्पर राहील, असे आश्वासन दिले. तालुका समन्वयक पांडुरंग घोलप यांनी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव मांडला.
कार्यक्रमात धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजिंक्य बारंगुळे, किरण स्वामी, राहुल बुरसे, अर्जुन सोनावणे, रणजित घुमरे, विजय घोंगडे, सुहास व्हळे, स्वराज क्षिरसागर यांचेसह शहर व तालुक्यातील युवासेना, युवतीसेना, शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार तालुका प्रमुख अजय बादगुडे यांनी मानले. युवासेनेच्या या उपक्रमाने समाजसेवेचा आदर्श ठेवत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रसार केला. यामुळे तरुणाईला नवी प्रेरणा मिळाली आहे.
