मराठा समाजाला ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष : जरांगे पाटील व आनंद काशीद उपोषणाला सज्ज
महाराष्ट्र न्युज नेटवर्
बार्शी : 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत जरांगे पाटील उपोषणाला बसणार, बार्शीत आनंद काशीद आमरण उपोषण करणार.
राठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळावे यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला गती मिळावी म्हणून 25 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आनंद काशीद यांनी बार्शी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा निर्धार केला आहे
यासंदर्भात आनंद काशीद यांनी बार्शी तहसीलचे नायब तहसीलदार सुभाष बदे यांच्याकडे निवेदन सादर केले.
यावेळी आनंद काशीद म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रातील दोन कोटी मराठा समाज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी अंतर्गत आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी वाशी, नवी मुंबई येथे मराठा समाजाला ‘सगेसोयरे’ या मसुद्याचे आश्वासन दिले होते. या मसुद्यानुसार पंधरा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र, या आश्वासनाला आता एक वर्ष पूर्ण झाले असूनही अद्याप सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
“आता आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही,” असे काशीद यांनी स्पष्ट केले. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व लवकरात लवकर आरक्षण लागू करावे, अशी या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. मराठा समाजाच्या या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण सुरू होत असून, या आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप येण्याची शक्यता आहे.
