आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रस्त्याचे काम रखडले : नागरिकांचे हाल

Spread the love

पुणे : कोंढवा बुद्रुक येथील काकडे वस्ती भागातील रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जागा मालकाने जागा ताब्यात दिली. प्रशासनाने रस्ता उखडून ठेवला आहे; मात्र डांबरीकरणासाठी प्रशासन कोणता मुहूर्त साधत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

या रस्त्यावर शंभरहून अधिक निवासी इमारती, स्वामी विवेकानंद गार्डन, पी.जी.के.एम. स्कूल, मंगल कार्यालये असून तो मार्केटयार्ड ते कात्रज-कोंढवा रस्त्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे.

या रस्त्यामुळे शांतीनगर रस्त्यावरील वाहतुकीचा अर्धा ताण कमी होतो. तसेच या मार्गावरच व्ही.आय.आय.टी. कॉलेज देखील आहे. तरी देखील प्रशासन हा रस्त्या करण्यासाठी एवढे धीम्म का? असा सवाल या भागातील नागरिक उपस्थित करीत आहेत.