महात्मा फुले-सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : पवन श्रीश्रीमाळ शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षक आणि शाळांचा सन्मान करण्यासाठी महात्मा फुले-सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार, २३ जानेवारी २०२५ रोजी पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात संपन्न झाला.
या समारंभात महाराष्ट्र विद्यालय बार्शी या शाळेला राज्यस्तरीय कृतिशील शाळा पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, पुणे विभागाचे शिक्षण निरीक्षक रावसाहेब मिरगणे, समारंभाचे अध्यक्ष डॉ. श्रीमंत कोकाटे, तसेच आयआरएस अधिकारी विपुल वाघमारे उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, के. जी. मदने, सुहास वाघमारे, महेश माने, मनोज मिरगणे आणि विजय अनभुले उपस्थित होते. या गौरवासाठी शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी. टी. पाटील, सहसचिव ए. पी. देबडवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. मिराताई यादव आणि एस. बी. शेळवणे यांनी अभिनंदन केले.
शाळेच्या प्राचार्या के. डी. धावणे, पर्यवेक्षक एस. सी. महामुनी, पर्यवेक्षिका एन. बी. साठे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त केले आणि शाळेच्या यशाचे कौतुक केले.
महाराष्ट्र विद्यालय बार्शीने शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. या सन्मानामुळे शाळेने राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे.