ध्वजारोहण व राष्ट्रगीताच्या साक्षीने राष्ट्रीय उत्सवाचे औचित्य
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी “प्रजासत्ताक दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
ध्वजारोहणाचा कार्यक्रम व राष्ट्रगीताचे सादरीकरण जैनाश्रमच्या श्राविका शोभाबेन संचेती, मितेश संचेती व खुशबू संचेती यांच्या हस्ते पार पडले. वाचनालयाचे ऑ. सेक्रेटरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले.
प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.शोभाबेन संचेती यांचा सत्कार शकुंतला गुगळे यांच्या हस्ते, मितेश संचेती यांचा सत्कार किरण श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते, तर खुशबू संचेती यांचा सत्कार रश्मी पुनमिया यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी जैनाश्रमचे अध्यक्ष जयचंद सुराणा, उपाध्यक्ष चंद्रकांत कोठारी, ऑ. सेक्रेटरी अॅड. दिनेश श्रीश्रीमाळ, कोषाध्यक्ष संजय श्रीश्रीमाळ, ट्रस्टी भारत कोटेचा, गौतम बोथरा, माजी अध्यक्ष अशोक कुंकूलोळ तसेच वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, संचालक धिरज कुंकूलोळ, आनंद सुराणा, प्रमोद भंडारी, रूपेश कांकरिया व अशोक कांकरिया यांसह जैनाश्रमचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, श्रावक-श्राविका, वाचक वर्ग, सभासद व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता व आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या शेवटी वाचनालयाचे संचालक आनंद सुराणा यांनी आभार प्रदर्शन केले. सर्व उपस्थितांना अल्पोपहार व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल सुरेश यादव, क्लार्क विराज पतंगे, सहायक ग्रंथपाल पल्लवी तौर आणि सेविका रेखा यादव यांनी विशेष परिश्रम घेतले.