२०१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : पवन श्रीश्रीमाळ : गणेश जयंती निमित्त चिंतामणी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण २०१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
या शिबिरात श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीचे तज्ज्ञ उपस्थित होते. रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. चिंतामणी प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि सेवकांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.
या उपक्रमातून अनेक गरजू रुग्णांना मदतीचा हात मिळणार आहे. प्रतिष्ठानच्या वतीने भविष्यातही अशाच प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. या यशस्वी रक्तदान शिबिरासाठी सर्व रक्तदाते, प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांचे श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
