महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आझाद मित्र मंडळ, बिबवेवाडी यांच्या वतीने गणेश जयंतीनिमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या महाआरतीस मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे संपादक अभिजीत डुंगरवाल, माजी नगरसेविका मनीषा चोरबेले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास परिसरातील गणेश भक्त आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.