आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

समर्थ नगरमध्ये गणेश जयंती उत्साहात साजरी

Spread the love

भूम : समर्थ नगर येथील श्री विघ्नहर्ता गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या सोहळ्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून दर्शनासाठी मोठी गर्दी झाली.

गणेश जयंतीच्या पूर्वसंध्येला, 31 जानेवारी रोजी रात्री पाठसांगवी येथील भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 वाजता श्रीकांत खडके यांच्या हस्ते श्री गणेश मूर्तीला महाअभिषेक आणि महापूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी 8 वाजता वेदशास्त्र संपन्न राजाभाऊ धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत सामुदायिक हवन झाले.

यानंतर ह. भ. प. सागर महाराज कोल्हे यांचे सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत कीर्तन झाले, त्यानंतर पुष्पवृष्टी करत गणेश जयंती सोहळा पार पडला. दुपारी माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांच्या हस्ते महाआरती झाली, त्यानंतर दुपारी 1 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

सायंकाळी श्रींची पालखी मिरवणूक समर्थ नगर भागात काढण्यात आली. मिरवणुकीनंतर आरती होऊन गणेश जयंती सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.