प. पू. युवाचार्य महेंद्रऋषीजी म. सा. यांचा ४४ वा दीक्षा दिवस उत्साहात साजरा
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : नवकार प्रतिष्ठान आणि वाघोली श्री जैन श्रावक संघाच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या वाघोली श्री जैन स्थानक भवन इमारतीचे उद्घाटन तसेच प. पू. युवाचार्य महेंद्रऋषीजी म. सा. यांचा ४४ वा दीक्षा दिवस जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या इमारतीला “सौ. आशाबाई रमणलाल लुंकड जैन स्थानक भवन” असे नाव देण्यात आले आहे. सकाळी केसफाटा येथे प. पू. युवाचार्य महेंद्रऋषीजी म. सा. आणि अन्य साधू-साध्वींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर केसनंद फाटा ते अभिषेक लॉन्स पर्यंत घोषणांसह भव्य पदयात्रा काढण्यात आली.
भवनाचे उद्घाटन उद्योजक रमणलाल लुंकड, आशाबाई लुंकड, राजेंद्र लुंकड, रविंद्र लुंकड कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प. पू. युवाचार्य महेंद्रऋषीजी म. सा., प. पू. अक्षयऋषीजी म. सा., प. पू. प्रशांतऋषीजी म. सा., प. पू. कमलमुनी कमलेशजी म. सा., प. पू. गौतममूनिजी म. सा., प. पू. हितेंद्रऋषीजी म. सा., प. पू. प्रतिभाश्रीजी म. सा., प. पू. दिव्याज्योतीजी म. सा., प. पू. सत्यसाधनाजी म. सा., प. पू. पदमावतीजी म. सा. तसेच उद्योजक प्रकाश धरिवाल, विजयकांत कोठारी, पोपटलाल ओस्तवाल, विलास राठोड, दीपक लुंकड, अशोक पगारिया, माणिक दुगड, सुभाष ललवाणी, चंद्रकांत लुंकड, आमदार ज्ञानेश्वर कटके, आमदार बापूसाहेब पठारे, प्रदीप कंद आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात स्थानक भवन उभारणीसाठी आर्थिक योगदान देणाऱ्या दात्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ४४ व्या दीक्षा दिनानिमित्त नवकार प्रतिष्ठान आणि श्री जैन श्रावक संघ वाघोलीतर्फे प. पू. युवाचार्य महेंद्रऋषीजी म. सा. यांना चादर अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान सुशील बहुमंडळ यांनी नवकार महामंत्र पठण आणि स्वागत गीत सादर केले. पुणे व परिसरातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यभरातून जैन बांधव आणि भगिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष चंदशेखर लुंकड यांनी केले. सूत्रसंचालन मनोज कांकरीया यांनी तर आभार प्रदर्शन संदीप चोरडीया यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नवकार प्रतिष्ठान आणि श्री जैन श्रावक संघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
