आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

प्रा. बोराडे यांना पीएचडी प्रदान

Spread the love

भूम : शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथील समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक तसेच पाथरुड ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी रामभाऊ बोराडे यांना पीएचडी प्रदान करण्यात आली. डॉ. सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. बोराडे यांनी संशोधन पूर्ण करून विद्यापीठास सादर केले होते.

श्री जगदीशप्रसाद झांबरमल टिबड़ेवाला विश्वविद्यालय, झुंझुनूं, राजस्थान येथे “महात्मा फुले सामाजिक विचारवंत: एक चिकित्सक अभ्यास” या विषयावर शोधप्रबंध सादर करून पीएचडी प्राप्त केली.
बोराडे यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उद्धव निवृत्ती बोराडे, उपाध्यक्ष दत्तात्रय बोराडे, सचिव मुरलीधर काटे, उपसचिव तथा प्राचार्य संतोष शिंदे आणि अशोकराव मोटे यांनी त्यांचे अभिनंदन केले.