भूम येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : अरुण गाढवे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ व्याख्यानमालेचे आयोजन केले असून यंदाचे सातवे वर्ष आहे. यंदाही कै. सौ. कावेरी चंद्रकांत गाढवे यांच्या स्मरणार्थ “स्मरण आक्काचं” व्याख्यानमाला ८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता नगर परिषदेसमोरील प्रांगणात व्याख्याते यशवंत गोसावी यांचे व्याख्यान होणार आहे. “विश्व स्वधर्म सूर्य पाहू – पसायदानाची एक आळख” या विषयावर ते विचार मांडणार आहेत. उद्घाटन नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी अॅड. अमरसिंह ढगे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून कुस्ती सम्राट पै. असलम काजी उपस्थित राहणार आहेत.
९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता व्याख्याते इंजि. प्रवीण भोसले हे “मराठ्यांचा इतिहास” या विषयावर व्याख्यान देणार आहेत. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य संतोष शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य पुरुषोत्तम पाटील, मुलाखतकार चंद्रकांत तांबे आणि विशेष गौरवमूर्ती निलेश वीर, सागर गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
१० फेब्रुवारी रोजी व्याख्याते केतन पुरी हे “अष्टपैलू छत्रपती शिवराय – प्रश्नोत्तरांच्या गप्पा” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ते गड-किल्ले आणि पुरातन मंदिर अभ्यासक असून पुण्यातील संशोधक आहेत.
यावेळी कवी व पत्रकार रवींद्र केसकर आणि आकाशवाणी निवेदक दौलत निपाणीकर उपस्थित असतील. अध्यक्षस्थानी सत्येंद्र मस्कर असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुनील मोरे आणि प्राचार्य नंदकुमार नन्नवरे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन आशुतोष गाढवे, किरण लोहार, नागेश डोंगरे, अक्षय सुर्वे, अॅड. विलास पवार, संतोष वराळे, हारून पठाण, स्वप्निल दुधाळ, महेश होनराव, सचिन मुळे, हरी गाढवे, प्रज्ञानंद सुकाळे, अनिल शेळके, सचिन भासले, अरुण शेंडगे, गुरु गिलविले, विनोद गाढवे, संजय इटकर, विठ्ठल बागडे, योगेश आसलकर आदी मित्र परिवारांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमास बंधू-भगिनी युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गाढवे परिवाराकडून करण्यात आले आहे.
