आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हाडोंगरी येथे संत रविदास महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

Spread the love

भूम: भूम तालुक्यातील मौजे हाडोंगरी येथे समतेचे महानायक संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हाडोंगरी ग्रामपंचायत व समाज बांधवांच्या वतीने हा सोहळा साजरा करण्यात आला.

संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंगरीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मुक्तप्पा तळेकर, सरपंच संदीप मगर, उपसरपंच रवींद्र लोमटे, ग्रामसेविका नीलम जानराव, प्रशांत कदम, तसेच भगवंत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अनिल तळेकर यांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला दादासाहेब रामगुडे, संतोष शिंदे, बालाजी रामगुडे, महादेव शिंदे, अनंतराव रामगुडे, नरेंद्र रामगुडे, भाग्यवंत रामगुडे, सनी रामगुडे, अनिकेत रामगुडे, किरण टेकाळे, निलेश टेकाळे, शरद कसबे, भरत सुरवसे, अशोक वाघमारे, युवराज शिंगटे, सुनील तळेकर, महादेव तळेकर, चंद्रसेन रामगुडे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अभिवादन सोहळ्याच्या निमित्ताने संत रविदास महाराज यांच्या विचारांची महती सांगण्यात आली. समाजातील समता, बंधुता आणि एकात्मतेच्या विचारांना उजाळा देत उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विचार आचरणात आणण्याचा संदेश दिला.