पूज्य दीपकभाई यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा : सत्संग आणि ज्ञानविधीचे आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याच्या वारश्यात आणखी एक भर पडतीये आणि तो म्हणजे दादा भगवान प्रणित निष्पक्षपाती त्रिमंदिर. पुणे-बेंगळुरू महामार्गा वरील खेड शिवापूर जवळ वरवे बुद्रुक मधे बांधलेल्या या अप्रतिम त्रिमंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा 12 ते 16 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
जसे जर घरात मतभेद असतील, तर घरात शांतता नांदत नाही, तसेच धर्मात भेदभाव असेपर्यंत खऱ्या अर्थाने शांती नांदू शकत नाही. परम पूज्य दादा भगवान यांनी दिलेल्याया धर्मातील भेदभाव मिटवण्याच्या संदेशाच्या भावनेतून हे त्रिमंदिर उभारण्यात आले आहे.
या त्रिमंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात विद्यमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी भगवान, श्री कृष्ण भगवान आणि भगवान शिव, असे हिंदू धर्मातील तीन मुख्य पंथाचे (जैन, वैष्णव आणि शिव) देवांची स्थापना करण्यात आली आहे. अशा प्रकारे या तीन मुख्य पंथातील देवांचे दर्शन एका छत्र खाली घेणे आता शक्य झाले आहे.
या तीन मुख्य देवां शिवाय कुलस्वामिनी श्री तुळजा भवानी माता, आद्यशक्ति श्री अंबा माता, श्री पद्मावती माता, श्री चक्रेश्वरी माता, श्री भद्रकाली माता, श्रीनाथजी, श्री तिरुपति बालाजी, श्री साई बाबा, श्री हनुमानजी आणि श्री गणपतीजी चे पण दर्शन इथे होईल.
सिद्ध भगवंतांमध्ये श्री आदिनाथ, श्री अजितनाथ, श्री पार्श्वनाथ, श्री महावीर आणि येत्या चोविसाव्यातील प्रथम तीर्थंकर श्री पद्मनाभ प्रभू यांचीही या मंदिरात स्थापना करण्यात आली आहे.
निष्पक्षपाती त्रिमंदिराचे विशेष आकर्षण आहे येथे विराजमान श्री सिमंधर स्वामींची अखंड संगमरवरातून साकारलेली १३ फूट ऊंचीची भव्य प्रतिमा.
आत्मधर्माचे प्रतीक असलेल्या अरिहंत भगवानांचा ह्या मूर्तीचे दर्शन घेऊन अलौकिक शांतता आणी स्थिरताचा अनुभव प्रत्येक दर्शनार्थीला येईल. या पाच दिवसांच्या महोत्सवातर्गत १२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ ते ७:३०, १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२:३० आणि संध्याकाळी ५ ते ७:३०, तसेच १४ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ ते ७:३० यावेळेत पूज्य दीपकभाई यांच्या बरोबर प्रश्नोत्तरी सत्संग आयोजित करण्यात आला आहे.
या सत्संगात कोणीही आपले अध्यात्मिक किंवा व्यवहारिक प्रश्न विचारून पूज्य दीपकभाई कडून त्यांचे समाधानकारक उत्तर मिळवू शकतो. शनिवार 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 7.30 या वेळेत आत्मसाक्षात्कार साधण्यासाठी ‘ज्ञानविधि’ ह्या अद्भूत प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्ञानविधि घेऊन कोणत्या ही धर्माचा त्याग न करता, कोणत्या ही गुरु न बदलता, आत्मानुभव घेता येतो आणि संसारातील जबाबदाऱ्या सांभाळूनही मुक्तीचा अनुभव मिळतो. त्रिमंदिरात स्थापित केलेले सर्व देवी-देवतांच्या प्रतिमांची प्राणप्रतिष्ठा पूज्य दीपकभाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 12.45 या वेळेत शिव भगवंत आणि इतर देवदेवतांची आणी 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 12.45 या वेळेत भगवान श्रीकृष्ण आणि इतर देवदेवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
रविवार 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 12.45 या वेळेत विद्यमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी भगवंत व इतर देवी-देवतांची प्राणप्रतिष्ठा व प्रक्षाळ-पूजन-आरती करण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी 5 ते 7.30 या वेळेत त्रिमंदिर संकुलात विशेष भक्तीचे आयोजन ही करण्यात आले आहे.
या विशाल त्रिमंदिर संकुलात 1000 ते 1200 आसनक्षमता असलेला सत्संग हॉल, सात्विक भोजन देणारे भोजनालय, फूड कोर्ट तसेच आधुनिक रहण्याची सोय असलेले गेस्ट हाऊस देखील बांधले जात आहेत.
प्राणप्रतिष्ठा महोत्सवात विविध सामाजिक संस्था आणी इतर क्षेत्राशी निगडित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या अलौकिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देश-विदेशात स्थायिक झालेले दादा भगवान परिवाराचे अनुयायी मोठ्या संख्येने पुण्यात आले आहेत.
परम पूज्य दादा भगवानांची जगात सुख, शांती आणि आनंद पसरवण्याची एकमात्र भावना पूर्ण करत, 19 त्रिमंदिरे आज लाखो मुमुक्षूंसाठी अंतर्गत मतभेदां पासून मुक्त होण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी एक मजबूत आधारस्तंभ बनली आहेत.
निसर्गरम्य टेकडीवर वसलेलं पुणे त्रिमंदिर महाराष्ट्र आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी शांती आणि समज देणारं पवित्र स्थळ ठरेल तसेच आजूबाजूच्या गावांसाठी धर्म आणि अध्यात्माचे प्रमुख केंद्र बनेल असा विश्वास आहे.
